geography class 8 lesson 7 answer marathi medium
इययता आठवी भुगोल धडा ७ . लोकसंख्या स्वाध्याय प्रश्न १. खालील विधाने पूर्ण करा. (अ) जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या........ (i) कमी होते. (ii) वाढते . (iii) स्थिर होते. (iv) अतिरिक्त होते. (आ) ...वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. (i) ० ते १४ (ii) १४ ते ६० (iii) १५ ते ६० (iv) १५ ते ५९ (इ) समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार... घटकावर अधिक अवलंबून असतो. (i) लिंग गुणोत्तर (ii) जन्मदर (iii) साक्षरता (iv) स्थलांतर प्रश्न २. खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा. (अ) प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते. उत्तर - अयोग्य योग्यविधान — प्रदेशाची लोकसंख्येची घनता त्याच्या क्षेत्रफळावरून आणि त्या प्रदेशात राहणाऱ्या एकूण लोकसंख्येवरून समजू शकते. (आ) साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते. उत्तर — योग्य (इ) ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते, त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो. उत्तर — योग्य (ई) अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय. उत्तर — अयोग्य योग्यविधान — अधिक आर्थ...